मनीषा का जीवन परिचय

नाव: मनीषा मनोज शहारे 

मुक्काम: कन्हांळगाव | पोस्ट: राजोली | तहसील: अर्जुनी/मोरगाव | जिल्हा: गोंदिया( महाराष्ट्र राज्य) 
शिक्षण: बीए पार्ट 2 | वय: 37 वर्षे
आईचे नाव: धनवंता रमेश भैसारे | वडीलाचे नाव: रमेश मोतीराम भैसारे
आवड: गाणं म्हणे, भाषण देणे, लोकांच्या कल्याणार्थ काम करणे

गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा हे माझे जन्मस्थान आहे। माझं शिक्षण बारावीपर्यंत महागांव या गावात झाले। तर त्यानंतरचे शिक्षण अर्जुनी/मोरगाव, मध्ये शिवप्रसाद सदानंद जायस्वाल कॉलेज मधून पूर्ण केले। वडिलांची परिस्थिती हालाखीची असतांनाही आपली मुले शिकली पाहिजे यासाठी आई-वडिलांनी कष्ट केले। आपले भावंडेही शिकली पाहिजे व आईवडिलांना मदत झाली पाहीजे। यासाठी घरातील मोठी मुलगी म्हनुन शेतीची व शेतमजुरीचे काम करीत गेले। व शिक्षण पूर्ण केले। शिक्षणानंतर 2004 ला आई-वडिलांनी अर्जुनी मोरगांव तालुक्यातील केसोरी परिसरातील अगदी गोंदिया जिल्ह्याचा शेवटचा गांव कन्हाळगाव या ठिकानी विवाह करून गेले।

माझे पती मनोज महादेव शहारे। मी माझा मोठा मुलगा मंथन, व लहान मयंक असं चार लोकांचे माझं छोटे कुटुंब आहे। कण्हाळगांव या गावात लग्न करून गेल्यानंतर बारावीनंतर शिकलेली मी पहिली मुलगी होते। गावात  येवढी शिकलेली महिला एवढ्या खेड्या गावात राहील की नाही अशा चर्चा गावात होत असत। गावात आदिवासी, छत्तीसगढी, ओबीसी, एससी, एनटी, या समूहातील लोक राहतात। लग्नानंतरही अस्पृश्यता काय आहे याचा अनुभव या गावात आला। लग्नानंतर विहिरीवर पाणी भरू न देणे या प्रसंगात तोंड द्यावे लागले। परंतु रिझर्वेशन मुळे ग्रामपंचायत येथे एक शिकलेली महिला म्हणून निवडून देण्याची इच्छा गावातील लोकांची होती। राजकारणाचा कुठलाही अनुभव नसलेली मनीषा ग्रामपंचायतची सदस्य झाली। आणि ग्रामपंचायत चे कारभार कसे चालते, गाव विकासाच्या कुठल्या-कुठल्या योजना गावात आणता येतात, याविषयी माहिती मिळाली। सगळ्यात जाती समूहाच्या महिलांशी चर्चा करण्याची संधी मिळाली। त्यांच्या जवळ जाता आलं। बोलता आलं। त्या परिसरातले राजकारण हे समजता आले. ग्रामपंचायत सदस्य असतांनाच काही महिलांचे निराधार योजनांचे फॉर्म घेऊन तहसील ला गेले। तहसील ला गेल्यानंतर अधिकारी कसे टाळाटाळ करतात याचा अनुभव आला। पण त्यावेळी तेवढं काही वाटलं नाही। पुढे जाण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीला तोंड देण्यास कोणाचं मार्गदर्शन मिळालं नाही। त्यानंतर 2015 मध्ये उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना सोबत काम करण्याची संधी मिळाली व गावात समूह संसाधन व्यक्ती या पदावर गाव स्तरावर काम करणारे कार्यकर्ती म्हणून निवड झाली। गावातील सर्व जाती समूहांच्या महिलांना एकत्र आनुन दहा महिलांचा एक गट बांधणी करणे। ज्या महिला घराच्या बाहेर निघाल्या नाहीत। अशांना ही बँक व्यवहार समजावून सांगणे। या निमित्ताने त्यांना बाहेर काढणे, उद्योग काय आहेत आणि त्यातून महिलांचा विकास कसा होऊ शकतो। या विषयी मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली। हे करीत असताना महिलांचे जीवनमान अगदी जवळून पाहता आले. त्यांच्या मनात असलेली अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, लक्षात आल्या।

त्यातूनच वेगवेगळ्या गावात तालुक्यात व जिल्ह्यात गट बांधणी करण्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून निवड झाली। व बाहेर जाण्याची संधी मिळाली। बाहेर गावात राहून गट बांधणी करणे, तिथल्या सरपंचांशी चर्चा करणे, पोलीस पाटलांना भेटी देणे, यातून बाहेरील लोकांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याचा अनुभव आला… 2019 ला सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये गट बांधणी करणे करिता जाण्याची संधी मिळाली व त्याच काळात त्या भागामध्ये पूर आला होता। पहिल्यांदा पूरपरिस्थिती पाहतांना कुटुंब कसं अस्ताव्यस्त होतात हे समजता आले। परंतु बचत गटांच्या माध्यमातून गटांना ट्रेनिंग देणे। त्यांना शासकीय योजनांची माहिती देणे, ग्रामपंचायतीं मध्ये सहभाग वाढविणे, याविषयी सतत बोलत असल्यामुळे आज ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे।

गावातील महिलांनी उद्योग करावा हे लक्षात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम ही करते। रानावनातून वनउपज गोळा करून उद्योग करने, धान खरेदी करून ते विकणे पळसाच्या झाडावर लाख चा व्यवसाय करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करण्यास सुरुवात झाली व कमी लागत मध्ये जास्त मुनाफा महिलांना मिळण्यास सुरुवात झाली। सर्व गट मिळून ग्रामसंघ स्थापन करण्यात आले. व एका क्लस्टर मध्ये जेवढे ग्रामसंघ आहेत तेवढ्या ग्राम संघाचे प्रभाग संघ तयार करून त्या प्रभाग संघामार्फत व्यवहार करण्याचे शिकविण्यात आले। हे सगळे करीत असताना बाहेरील परिस्थितीचा अनुभव, महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या गावातील परिस्थिती अंधश्रद्धा, बेरोजगारी, व शासकीय योजनांचा अभाव ह्या सगळ्या गोष्टी मुळे आपल्या परिसरातील गाव किती मागे आहेत। व या कडे कुनीही लक्ष देत नाही हे लक्षात येते। त्याचवेळीदोन वर्षापूर्वी कष्टकरी जन आंदोलनाचे नेते विलास भोंगाडे यांनी आयोजित केलेल्या कुरखेडा जवळील येरंडी या गावातील प्रशिक्षणाल सहभागी होण्याचे संधी मिळाली व त्यातूनच संविधान, जंगल जमिनीचे अधिकार, शासकीय योजना मिळणे। हे आपले अधिकार आहे। आपल्या गावाच्या विकासासाठी कोणी कसं काम केलं पाहिजे। त्यात आपली भूमिका काय आहे। हे लक्षात आले। व नंतर विलास भाऊंचे मार्गदर्शन सतत लाभत राहिले। यातूनच आपल्या भागातील महिलांची एक संघटना निर्माण करावी। वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन काम करावे अशी संकल्पना सुचली। आणि त्यानंतर 26 नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी असे मार्गदर्शन विलास भाऊंनी केले परिसरातील 35 ग्रामपंचायतीचे सरपंच यांना भेटून ग्रामपंचायतीच्या सदस्यांना भेटून कार्यक्रमाचा व संघटना स्थापन करण्यामागचा एक उद्देश समजावून सांगण्यात आला। सर्वांच्या सहभागाने विलास भाऊंच्या मार्गदर्शनात संविधान दिनाच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, युवक, युवती, बचत गटातील महिला, सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला। एक ते दीड हजार महिलांचा मोठा कार्यक्रम परिसरात पहिल्यांदाच झाला। संविधाना बाबत वेगवेगळे गैरसमज असलेल्या या परिसरात संविधान दिन साजरा करणे खूप मोठी गोष्ट आहे। व या कार्यक्रमानंतर संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली सामाजिक परिवर्तन संघटनेच्या महिलांचा ग्रुप आपल्या भागात आहे याची एक नवी चर्चा परिसरात आहे त्यासोबतच विलास भाऊंच्या मार्गदर्शनात आमच्या परिसरातील जल जंगल जमीन या प्रश्नांवर काम करण्यासाठी व परिसरातील प्रश्न समजून घ्यायचं काम सध्या आम्ही करीत आहोत। विलास भाऊंच्या मार्गदर्शनात वाटचाल करून वंचित पीडित घटकांचे अधिकार मिळवून देणे। यासाठी सतत प्रयत्न करीत राहील।

Author

  • मनीषा शहारे / Manisha Shahare

    मनीषा, महाराष्ट्र के गोंदिया ज़िले से हैं और सामाजिक परिवर्तन शाला से जुड़ी हैं। वह कष्टकारी जन आन्दोलन के साथ जुड़कर स्थानीय मुद्दों पर काम कर रही हैं।

Leave a Reply