आम्रपाली जनार्दन तीगोटे:
शराब की लत में फंसे हुए लोगों के जीवन पर प्रकाश डालते हुए उनसे अपने परिवार व बच्चों के बारे में सोचने की गुहार लगाता हुआ यह लेख।
‘दारुडा’ हा शब्द कानी पडला की प्रत्येक जण त्याची अवहेलना करतो। आणि हे करण्याचे कारणही खुप असतात। तसे पाहता दारू पिण्याचे कारणही खुप असतात म्हणे। मला एवढे कसे माहीत तर मी पितो अशातला भाग नाही स्वत: ते लोक असे जमिनीसोबत आपले प्रेम सिद्ध करतेवेळी आवर्जुन सांगत असतात आणि असे लोक माझ्या जिवनातील एक अभिन्न अंग आहेत।
विज्ञानाच्या मते एकदा दारुची चव चाखली की पंधरा टक्के लोक त्याच्या आहारी जातात म्हणे, पण यावर काय उपाय तर त्यांचे समुपदेशन करणे आणि त्यांना न सांगता औषध देणे। यामुळे ठिक होईल तो दारुडा कुठला। आणि आता तर दारु किराणा दुकानावर मिळणार म्हणे। पण यामुळे जो त्रास त्यांच्या घरातील लोकांना होतो त्याचा कोणी विचार करणे आवश्यक समजतंय असं वाटत नाही।
घरातला एक माणूस दारूचा गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान वीस जणांचे तरी जीवन नासते। त्रासाला, िहसेला आणि निर्दयतेला बळी पडते। त्याच्या शरीराचे नुकसान होते ते वेगळेच। डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताही अवयव नाही जिथे दारूचा विपरीत परिणाम होत नाही। मेंदूवर होणारे ताण तर महाभयंकर असतात। आठवण, वर्तमानाचे आणि भवतालचे भान, विवेकबुद्धी, समतोल ही मेंदूची महत्त्वाची काय्रे मंदावतात. भावनांचा प्रक्षोभ होतो। ज्या सर्व प्राणिमात्रांत आढळणाऱ्या राग, संताप, द्वेष, दु:ख या भावनांचे प्राबल्य वाढते; तर प्रेम, नम्रता, कृतज्ञता, आदर या नव्याने विकसित झालेल्या भावना मागे पडतात। दारू पिणे, अतिरिक्त दारू पिणे, मद्यपाश, दारूची गुलामगिरी, दारूडा होणे असे अनेक शब्द आपल्याला ऐकू येतात। पण त्याचा नेमकं अर्थ काय हे समजत नाही। हे समजण्याकरता आपण एक छोटेसे उदाहरण घेऊ। माणूस दारू पिण्याच्या आजारात अडकला की काय होते?
एका बाजूला मानसिक गुलामी आणि दुसऱ्या बाजूला शारीरिक गुलामी या कात्रीत सापडतो. दोन्ही कात्रीची पती धारदार असतात. मानसिक ओढ इतकी अनावर असते की ती ओढ – आसक्ती त्याला ‘मला आत्ताच्या आत्ता, कोणत्याही परिस्थितीत, आणि कोणतीही किंमत मोजून दारू हवी म्हणजे हवी’ या विचारांच्या तो संपूर्णपणे आधीन होतो. इथे त्याला आपण करतोय ते चांगले का वाईट हे समजत नाही. आपण दारू घेतली तर शरीरावर, कुटुंबीयांवर काय परिणाम होतील याची फिकीर न करता माणूस दारू पितो. हीच ती मानसिक गुलामगिरी. आणि यामुळेच खुप जणांचे संसार उद्धस्त झाले आहेत.त्यांची मुले सांभाळताना ती माऊली काय त्रासहहन करत असेल याची कल्पना फक्त त्यांना असेल ज्या घरचा कर्ता दारुडा असेल.
मला काही त्यांना कमी लेखायचे नाही किंवा हिन म्हणायचे नाही पण सत्य ही लपवायचे नाही त्यांच्यामुळे घरातील जिवन नर्क बनते असे म्हटले तर खुप कमी आहे.मला त्यांना एकच सांगायचे आहे दारुडा बनण्या अगोदर किंवा बनल्या नंतर एक वेळ त्या जिवांचा जरुर विचार करावा जे आपल्या मुळे समाजात धडपडत व शरमेने जगण्याचा प्रयत्न करत आहेत..
फीचर्ड फोटो आभार: पत्रिका