आम्रपाली जनार्दन तीगोटे:
संपादकीय नोट: गत सप्ताह कर्नाटक में चल रहे हिजाब विवाद के दौरान एक वीडियो वाइरल हुआ जिसमें एक महिला स्टूडेंट को भीड़ घेर कर धमका रही है। इसी वीडियो पर लातूर की साथी आम्रपाली ने मराठी में अपने विचार साझा किए हैं।
बरोबर आहे ही विद्यार्थिनी जे सांगते आहे ते वास्तविक आहे। कारण कुठल्याही विभागात प्रगती साध्य करायची असेल तर योग्य शिक्षण घेणे गरजेचे आहे। आणि गरिब मुलांना शिक्षण घेण्याकरिता जेएनयु सारखे विद्यापिठात शिक्षण घेण अनेकांचे स्वप्न असते। कारण तेथे तुम्हाला उत्तम दर्जाचे शिक्षण दिले जाते।
पण या सरकार च्या काळात जसे खाजगीकरण चालु झाले आहे तसे मुलांचे शैक्षणीक अधिकार त्यांच्या पासुन दुर जात आहेत कारण त्यांची आर्थिक बाजु खुप नगण्यच। त्यामुळे ते शिक्षण घेऊच शकत नाहीत। आणि हाच या सरकारचा प्लॅन आहे। ते आपल्यासारख्यांना खुप खालच्या पातळीवर नेऊन ठेवतील आणि आपण गुलाम बनु हा त्यांचा अजेंडा आहे। आणि ते हळुहळु साध्य करत आहेत आणि आपण काहीच करत नाही। सलाम आहे या मुलीला जीने एवढे धाडस केले। आज गरज आहे त्यांना उघडे पाडण्याची। आणि ते फक्त सत्तांतर झाले तर होईल।
त्यांना शाळेत प्रवेश दिला नाही म्हणुन हा वाद पेटला आहे। आणि हिजाब घालण्याच्या समर्थनात हे आंदोलन चालु आहे। आणि याचा विरोध हिंदु मूल भगवी शाल घालुन करत आहेत।
ते सर्व सरकारी संस्थांची विक्री करतील आणि आपले शैक्षणीक आरक्षण संपवतील। आणि विद्यार्थ्यांमध्ये जातीयता निर्माण करुन त्यांच्यात हिंदु मुस्लीम,दलीत सवर्ण असा वाद निर्माण करतील आणि याची सुरुवात कर्नाटक येथे झाली आहे हिजाब घालण्यावरुन। तरी हे आपण वेळीच ओळखुन याचा विरोध करणे आवश्यक आहे।तरच आपले भविष्य बदलेल नाहीतर गुलामगिरी आहेच।
फोटो आभार: द हंस इंडिया