लखन चव्हाण:
बहुजन समाजातील शोषण,अन्याय, अत्याचार, दारिद्र्य, विषमता, लाचारी, बलात्कार, अंधश्रद्धा, अज्ञान, दैववाद, जातीयता पाहून अण्णाभाऊ अस्वस्थ होत. आणि त्यांचे मन पेटून उठे। आर्थिक विषमतेबरोबरच सामाजिक विषमतेचे चित्रनही अण्णाभाऊंच्या कथांमधून आले आहे। बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन गावकूसाबाहेर राहणार अस्पृश्य माणूस अन्यायाच्या, शोषणाच्या विरोधात कसा बंड करून उठतो हे त्यांनी कथा मधून मांडले आहे। अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावातून लिहिलेल्या काही महत्त्वाच्या कथा आहेत।
- बुद्धाची शपथ
- सापळा
- उपकाराची फेड
- वळण
- कोंबडी चोर
१. बुद्धाची शपथ – ही आंबेडकरवादी कथा आहे.जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेविरोधात बाबासाहेबांनी धर्मांतर केले होते। त्या धर्मांतराचा प्रभाव गाव- खेड्यातील महार जातीवर खोलवर पडला होता। बौद्ध धर्माने झालेला सकारात्मक बदल सूक्ष्म निरीक्षणाद्वारे अण्णाभाऊ या कथेत मांडतात।
२. सापळा – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीमुळे समाजामध्ये जे प्रबोधन झाले त्याचे वास्तव दर्शवणारी ही कथा अण्णाभाऊंनी लिहिली बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात 20 मार्च 1927 ला महाड येथील कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेच्या बैठकीत महत्त्वपूर्ण ठराव पारित झाला।
‘मेलेली जनावरे ओढून टाकण्याच्या बाबतीत बहिष्कृत लोकांवर अवलंबून न राहता आपली आपणच व्यवस्था करावी’
या ठरावामुळे महाराणी मेलेली जनावरे ओढणे बंद केले त्याचे तंतोतंत पालन गाव खेड्यात सुरू होते त्यामुळे गावातील सवर्ण मंडळी बदला घेण्याची योजना बनवतात परंतु महार जातीचे लोक या सापळ्याला उत्तर देतात। महत्त्वाचे म्हणजे ही कथा अण्णाभाऊंनी मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील धसवाडी या गावात ज्यावेळी ते आले होते त्यांनी आपल्या डोळ्यांनी हा प्रसंग पाहिला होता आणि ही कथा त्या ठिकाणी त्यांनी लिहिली।
३. उपकाराची फेड – अण्णाभाऊ साठे यांची ही कथा भारतीय समाज व्यवस्थेतील एक भयान वास्तव अधोरेखित करणारी आहे अतिशय समजल्या गेलेल्या अस्पृश्य जातीमधील अस्पृश्यता उपकाराची फेड या कथेतून अण्णाभाऊंनी चित्रित केली आहे मळू महार लखू मांग शंकर चांभार आणि मन्या परीट ही चारही अस्पृश्य जातीतील माणसं ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या धर्माच्या नावावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे अशा या अस्पृश्य जातीतील चौघांची ही कथा आहे।
४. वळण – ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण कथा आहे. धर्मांतरानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य लोकांना मेलेल्या जनावराचे मांस खाणे बंद करा असा संदेश दिला होता त्यातून गावोगावी रेड्याचे अथवा बैलाचे मांस खाणे महारलोक बंद करतात परंतु आयुष्यभराची सवय चिमा महारणीला आहे या कथेतून बाबासाहेब आंबेडकरांनी जो अस्पृश्य वर्गाला संदेश दिला त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी खेड्यातील महार लोक करत आहेत हे स्पष्ट होते।
एका अस्पृश्य जातीत जन्माला आल्यानंतर सामाजिक धार्मिक शोषणामुळे शोषितांच्या जीवनात कशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे वळण ही कथा होय परंपरागत जात मानसिकतेच्या बाहेर पडण्यासाठी आपले हिनत्व कायमचे घालवण्यासाठी मेलेल्या जनावराचे मांस खायचे नाही हा जागृत महारांचा निर्णय म्हणजे विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधातले बंड म्हणायला हवे चिमा महारणीला मात्र हे बंड पसत नाही त्यामुळे तिची शोकांतिका होते थोडक्यात वळण ही आंबेडकरवादी विचारांची प्रेरणा घेऊन येणारी एक महत्त्वाची विद्रोही कथा आहे।
५. कोंबडी चोर – ही एक जातीय विषमतेवर प्रहार करणारी महत्त्वाची कथा आहे। रामू हा या कथेचा नायक आहे। या कथेत अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्य विषयी आपले विचार मांडतात स्वातंत्र्य हे नेमके कोणाला मिळाले याचा अनुभव अण्णाभाऊंनी रामू व मास्तर यांच्या माध्यमातून या कथेमध्ये मांडला आहे। मास्तर रामूला स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत असतात रामू त्यांचे काही एकूण घेत नसतो मग मास्तर रामूला चहाच्या हॉटेलवर चहा पिण्यासाठी घेऊन जातात तिथे रामूला फुटक्या मळक्या कप बशी मध्ये चहा प्यावा लागतो त्यामुळे रामू मास्तरला बाहेर बोलावून आपल्या हातातील कपबशी दाखवत विचारतो यापैकी कोणाला स्वातंत्र्य मिळाली माझ्या फुटक्या मडक्या कपाला की तुमच्या स्वच्छ कपाला हा रामूचा प्रश्न देशातील सामाजिक विषमता शोषण चव्हाट्यावर आणणारा आहे एकूणच रामू व्यवस्थित च्या विरोधात विद्रोह करून पेटून उठत नसला तरी त्याचे बोलणे चालणे वागणे विषमतावादी व्यवस्थेला हादरे देणारे ठरते।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या प्रभावातून अण्णाभाऊ साठे यांनी या कथा लिहिल्या आहेत त्या अर्थाने ‘आंबेडकरी कथालेखक’ म्हणून सर्वप्रथम मान अण्णाभाऊ साठेंना द्यावा लागतो. बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर महार जातीमध्ये आलेले परिवर्तन मेलेली जनावरे ओढणी बंद करणे, गाई म्हशीचे मास खाणे बंद करणे, गावाने बहिष्कार टाकल्यावर सुद्धा जोमाने संघर्ष सुरू ठेवणे, जातीव्यवस्थेमधील क्रमिक असमानता संघर्ष, बंडखोरी, अन्याय विरोधात आवाज या बाबासाहेबांच्या तत्त्वावर आधारीत या कथांचे लिखाण केले आहे।
हिंदी अनुवाद
अम्बेडकरी चेतना की कहानियाँ: अण्णाभाऊ साठे की सामाजिक विद्रोही कथा-संपदा
बहुजन समाज में व्याप्त शोषण, अन्याय, अत्याचार, गरीबी, विषमता, लाचारी, बलात्कार, अंधश्रद्धा, अज्ञानता, भाग्यवाद और जातिवाद को देखकर अण्णाभाऊ साठे का मन व्यथित हो उठता था। उनका अंतर्मन इन सभी सामाजिक विडंबनाओं से झुलसता था। उनके साहित्य में केवल आर्थिक असमानता ही नहीं, बल्कि सामाजिक विषमता का भी प्रखर चित्रण हुआ है।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर की प्रेरणा से, अण्णाभाऊ ने गाँव की सीमाओं के बाहर रहने वाले अस्पृश्य व्यक्ति के अन्याय और शोषण के विरुद्ध खड़े होने की कहानियाँ लिखीं। डॉ. आंबेडकर के विचारों से प्रभावित होकर अण्णाभाऊ साठे ने कई महत्वपूर्ण कहानियाँ रचीं, जिनमें प्रमुख हैं:
- बुद्ध की शपथ
- साँप का फंदा
- एहसान का बदला
- मुड़ाव (वळण)
- मुर्गी चोर
1. बुद्ध की शपथ : यह एक आंबेडकरवादी कथा है। जब डॉ. आंबेडकर ने जातिव्यवस्था और अस्पृश्यता के विरोध में धर्मांतरण किया, तो इसका गहरा असर गाँव-कस्बों में रहने वाली महार जाति पर पड़ा। बौद्ध धर्म के कारण समाज में जो सकारात्मक परिवर्तन आया, उसे अण्णाभाऊ ने इस कहानी में अत्यंत सूक्ष्मता से चित्रित किया है। यह केवल धार्मिक परिवर्तन नहीं था, बल्कि सामाजिक चेतना का उदय था।
2. साँप का फंदा : यह कहानी डॉ. आंबेडकर की क्रांतिकारी आंदोलन से उपजे सामाजिक जागरूकता को दर्शाती है। 20 मार्च 1927 को महाड (जिला कुलाबा) में हुई बहिष्कृत परिषद की बैठक में एक ऐतिहासिक प्रस्ताव पारित हुआ –
“मरे हुए जानवरों को उठाने के कार्य में बहिष्कृतों पर निर्भर न रहकर स्वयं अपनी व्यवस्था की जाए।”
इस प्रस्ताव के बाद महार समुदाय ने मरे हुए जानवरों को उठाना बंद कर दिया। इससे गाँव के सवर्ण वर्ग में क्रोध और प्रतिशोध की भावना पैदा हुई। वे महारों के विरुद्ध साजिश रचते हैं, लेकिन महार समुदाय इस जाल (साँप का फंदा) का डटकर सामना करता है। यह कथा लातूर जिले के धसवाडी गाँव में अण्णाभाऊ द्वारा स्वयं देखे गए सत्य घटना पर आधारित है।
3. एहसान का बदला : यह कहानी भारतीय समाज में व्याप्त अस्पृश्यता की गहराई को उजागर करती है। ‘अस्पृश्य जाति के भीतर की अस्पृश्यता’ इस कथा का मूल विषय है। मळू महार, लखू मांग, शंकर चांभार और मन्या परीट—ये चारों दलित जातियों के लोग हैं, जिन्हें सदियों से धर्म के नाम पर अत्याचार सहना पड़ा है। यह कहानी दिखाती है कि किस प्रकार एक ही पीड़ित वर्ग के भीतर भी सामाजिक भेदभाव मौजूद है।
4. मुड़ाव (वळण) : धार्मिक रूपांतरण के बाद डॉ. आंबेडकर ने अपने अनुयायियों को मरे हुए जानवरों का मांस खाना बंद करने का निर्देश दिया। इसका पालन गाँव-गाँव में बड़ी निष्ठा से होने लगा। ‘चिमा महारिण’ इस कहानी की मुख्य पात्र है, जिसे इस परंपरा को छोड़ना कठिन लगता है।
यह कथा दिखाती है कि सामाजिक और धार्मिक शोषण से उपजे प्रश्न किस तरह एक दलित महिला के जीवन में संकट पैदा करते हैं। चिमा की दुखांत कथा बताती है कि समाज में बदलाव के लिए केवल नीतियां नहीं, बल्कि मानसिकता का परिवर्तन भी आवश्यक है। यह कहानी एक तरह से सामाजिक विद्रोह का प्रतीक है।
5. मुर्गी चोर : यह एक तीव्र सामाजिक व्यंग्यात्मक कथा है, जो जातीय भेदभाव और स्वतंत्रता की असलियत को उजागर करती है। रामू इस कहानी का नायक है। कहानी में अण्णाभाऊ साठे यह प्रश्न उठाते हैं कि “स्वतंत्रता वास्तव में किसे मिली है?”
रामू और मास्तर के संवाद में यह प्रश्न उभरता है, जब मास्तर उसे स्वतंत्रता का महत्त्व समझाते हैं। रामू को होटल में टूटी-फूटी चाय की कप-बशी में चाय दी जाती है। वह मास्तर से पूछता है –
“बताइए, किसे स्वतंत्रता मिली है – इस टूटी हुई प्याली को या आपके साफ-सुथरे कप को?”
रामू का यह सवाल समाज में व्याप्त असमानता और भेदभाव पर गहरी चोट करता है। भले ही वह खुले तौर पर विद्रोह न करे, पर उसका व्यंग्यात्मक व्यवहार और चिंतन, जातिवादी व्यवस्था की नींव को हिला देता है।
डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचारों से प्रेरित होकर अण्णाभाऊ साठे ने इन कहानियों की रचना की। इस दृष्टि से उन्हें ‘प्रथम आंबेडकरी कथाकार’ कहना सर्वथा उचित होगा। उनकी कहानियाँ केवल साहित्य नहीं, बल्कि आंदोलन की दस्तावेज़ हैं। बौद्ध धर्म की दीक्षा के बाद महार समाज में आए बदलाव—मरे हुए जानवरों को उठाने से इनकार, मांस खाना बंद करना, सामाजिक बहिष्कार के बावजूद संघर्ष करते रहना, जातिगत असमानताओं के खिलाफ आवाज उठाना—इन सबका प्रतिबिंब उनके कथा-साहित्य में मिलता है।
अण्णाभाऊ साठे की कहानियाँ हमें न केवल समाज की सच्चाई दिखाती हैं, बल्कि बदलाव की प्रेरणा भी देती हैं।

Leave a Reply