आनंद अंबादास कंजे:

भारत हा मुळात कृषिप्रधान देश असल्यामुळे आजही सर्वाधिक रोजगार हा शेतीमधूनच मिळतो। तसेच भारतातील सर्वाधिक लोक हे गाव, खेड्या-पाड्यांमध्येच राहतात। त्यामुळे त्यांचा उत्पन्नाचा एकमेव स्रोत म्हणजे शेती हा आहे।

परंतु आजघडीचा विचार करता प्रत्येक क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल झालेला दिसतो। जसे की, पूर्वी पेरणी, खुरपणी, नांगरणी, फवारणी आणि रास (पीक काढणी) ही सर्व कामे माणूस करायचा। त्यामुळे वेळ व मेहनत जास्त लागायची, परंतु प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळायचा। पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अशा पारंपरिक पद्धतीने कामे करणे म्हणजे कौशल्याचा वापर कमी आणि शारीरिक किंवा अंगमेहनतीचे काम अधिक असे होईल। वाढत्या गरजानुसार ही मेहनत अपुरी पडेल। वाढणाऱ्या गरजा, निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत्या लोकसंख्येचा विचार करता आज पारंपरिक शेती तेवढी उपयुक्त ठरणार नाही। त्यामुळे जसे विविध उद्योगधंदे, उत्पादन निर्माण करणाऱ्या कंपन्या किंवा माहिती तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या असतील, अशा प्रत्येक क्षेत्रात विकसित तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे बदल घडून आलेला दिसतो।

आज ग्रामीण भागात पारंपरिक व्यवसाय म्हणून शेती जरी असली, तरी त्यात आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर दिला पाहिजे। आज ग्रामीण भागात शेतीसाठी मजूर मिळणे फार अवघड झाले आहे। त्याचे एक कारण म्हणजे तंत्रज्ञानाचा वाढता वापर। यामुळे ग्रामीण भागातही बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे। याला पर्याय म्हणून शेतकऱ्यांची मुले विविध कामे करण्यासाठी शहराकडे जात आहेत आणि तिथे मिळेल ते काम करीत आहेत।

आज मुंबई, पुणे यांसारखी शहरे प्रत्येकाचे आकर्षण ठरू लागली आहेत। आज अनेक गावे-खेडी पाहिल्यास बरीच गावे ओसाड पडल्यासारखी दिसतात, कारण गावातील तरुण शहराकडे वळला आहे। रोजगारासाठी शहराकडे जाणे यात काही गैर नाही; मात्र स्वतःची शेती ओसाड टाकून, त्याकडे कसलेही लक्ष न देता शहराकडे स्थलांतरित होणे हे मात्र विचार करण्यासारखे आहे।

पारंपरिक पद्धतीने शेती न करता त्यात नवनवीन बदल करून, आधुनिक पद्धतीने व तंत्रज्ञानाचा वापर करून जर शेती केली, तर तो एक सधन शेतकरी होऊ शकतो। तसेच तो स्वतः दुसऱ्याला रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो। उदाहरणार्थ, शेतीबरोबर जोड व्यवसाय म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, वराहपालन आणि दुग्ध व्यवसाय केला, तर एक चांगला जोड व्यवसाय उभा राहील। त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळेल आणि आर्थिक हातभार लागेल। त्याचे शहराकडे होणारे स्थलांतर किंवा पलायन थांबेल आणि तो शेतात राबणारा मजूर किंवा हतबल शेतकरी न राहता आर्थिकदृष्ट्या सक्षम शेतकरी बनेल. गाव-खेडे ओसाड न राहता परिपूर्ण खेडी बनतील आणि महात्मा गांधींचा “खेड्याकडे चला” हा संदेश व त्यांचे स्वप्न पूर्ण होईल।

हिंदी सारांश 

खेती, मज़दूरी, पलायन और बदलता ग्रामीण जीवन

भारत आज भी मुख्य रूप से कृषि पर आधारित देश है, लेकिन बदलती तकनीक, बढ़ती आवश्यकताओं और खेती में श्रमिकों की कमी के कारण ग्रामीण जीवन तेज़ी से बदल रहा है। रोज़गार की तलाश में बड़ी संख्या में किसान परिवारों के युवा शहरों की ओर पलायन कर रहे हैं, जिससे गाँव और खेती दोनों प्रभावित हो रहे हैं।

लेखक मानते हैं और सुझाव करते हैं कि पारंपरिक खेती के साथ आधुनिक तकनीकों को अपनाया जाए और पशुपालन, कुक्कुट पालन, मत्स्य पालन, दुग्ध व्यवसाय जैसे पूरक व्यवसायों को बढ़ावा दिया जाए। इससे किसानों की आय बढ़ सकती है, स्थानीय स्तर पर रोज़गार मिल सकता है और शहरों की ओर होने वाला पलायन कम हो सकता है। ऐसे प्रयासों से गाँव अधिक समृद्ध बनेंगे और आत्मनिर्भर ग्रामीण भारत का सपना साकार करने में मदद मिलेगी।

Author

  • आनंद अंबादास कंजे महाराष्ट्र के लातूर ज़िले के उदगीर तहसील के निवासी हैं। वे पिछले दो वर्षों से सामाजिक परिवर्तन शाला से जुड़े हैं। इस पहल से जुड़ने के बाद उन्होंने संवैधानिक मूल्य, अंधश्रद्धा, पृथ्वी की उत्पत्ति, मानव की उत्पत्ति और संसाधनों के असमान वितरण जैसे विषयों पर प्रशिक्षण प्राप्त किया। वर्तमान में वे इन विषयों पर कार्यशालाओं का आयोजन कर समाज में जनजागरूकता फैलाने के साथ-साथ विभिन्न सामाजिक मुद्दों पर समुदाय के बीच सक्रिय रूप से कार्य कर रहे हैं। 

    View all posts

Leave a Reply

Designed with WordPress

Discover more from युवानिया ~ YUVANIYA

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading