दीपक कांबले:

बदलत्या वातावरणामुळे शेतकऱ्यांपुढे आज खूप मोठे आव्हान निर्माण झाले आहे. बदलत्या वातावरणाचा परिणाम महाराष्ट्रातील शेतीवर, पर्यायाने शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे.

वीस-पंचवीस वर्षांपूर्वी वातावरण एकदम व्यवस्थित राहत असे. वेळेवर पाऊस, पाणी, ऊन, थंडी यांचा समतोल राखला जायचा. पण आजच्या परिस्थितीमध्ये वाढत्या कंपन्या, वायू प्रदूषण, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, रासायनिक खते, बियाणे, औषधे, हायब्रीड बियाणे यांचा वाढता वापर आणि याकडे असलेले सरकारचे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये बदल होत आहे.

या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेतकरी आणि शेतीसमोरील खूप मोठे आव्हान म्हणून दिसून येत आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि वादळी वारे यांचा परिणाम शेतीवर होत आहे. या सर्व बदलांचा परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होत असल्यामुळे त्याची झळ शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. शेती आणि शेतीच्या उत्पन्नावर या बदलत्या वातावरणाचा परिणाम स्पष्टपणे जाणवत आहे.

महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती हा व्यवसाय केला जातो. ही शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. या भागामध्ये सिंचनाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे येथील शेतीही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. बदलत्या वातावरणामुळे या भागात पाऊस वेळेवर पडत नाही. कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ निर्माण होतो. मात्र मोठ्या प्रमाणात मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. याचा प्रत्यक्ष परिणाम शेतीवर होत असल्यामुळे पर्यायाने शेतीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते.

मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर, हायब्रीड बियाण्यांचा वापर, तणनाशकांचा वापर इत्यादींचाही परिणाम हवामान बदलावर होत असून, त्याचबरोबर शेतीचा वाढता खर्च आणि कमी होत जाणारे उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांना हंगामी शेती करणे अवघड जात आहे.

वातावरणाचा परिणाम शेती आणि शेतकऱ्यांवर होत असून, पावसाचे अनियमित आगमन, कमी-जास्त पाऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, दुष्काळ व अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट, तसेच कीड आणि पिकांवरील रोगांचे वाढते प्रमाण यामुळे शेती करणे अधिक खर्चिक झाले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात आहे.

आज मराठवाडा आणि विदर्भातील युवा शेतीकडे वळताना दिसत नाही. याचे एक प्रमुख कारण म्हणजे बदलते हवामान आणि या बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनात होत असलेली घट. त्यामुळे आजचा युवा शेती व्यवसायाकडे वळताना दिसत नाही.

हिंदी सारांश: बदलता वातावरण और किसान

बदलते मौसम का सबसे अधिक प्रभाव किसानों और खेती पर पड़ रहा है। अनियमित वर्षा, बढ़ता तापमान, सूखा, अतिवृष्टि, ओलावृष्टि और तेज़ हवाओं जैसी परिस्थितियों ने विशेष रूप से महाराष्ट्र के मराठवाड़ा और विदर्भ क्षेत्रों की वर्षा-आधारित खेती को प्रभावित किया है। सिंचाई की कमी के कारण इन क्षेत्रों के किसान प्राकृतिक परिस्थितियों पर निर्भर हैं, जिससे उनकी आय और उत्पादन लगातार प्रभावित हो रहे हैं।

लेख में यह भी बताया गया है कि रासायनिक खेती, बढ़ता प्रदूषण, वृक्षों की कटाई और पर्यावरण के प्रति उपेक्षा ने जलवायु परिवर्तन की समस्या को और गंभीर बनाया है। खेती की लागत बढ़ने, उत्पादन घटने और लगातार बढ़ती अनिश्चितता के कारण किसान संकट में हैं। यही कारण है कि अनेक युवा खेती से दूर हो रहे हैं और कृषि को आजीविका के रूप में अपनाने से हिचक रहे हैं।

Author

  • दीपक, महाराष्ट्र के लातूर ज़िले से हैं और सामाजिक परिवर्तन शाला से जुड़े हैं। दीपक पिछले 10 वर्ष श्रमजिवी संघटना, मराठवाडा के साथ जुड़ कर क्षेत्र के समुदायों के हक़-अधिकारों के लिए काम कर रहे हैं।

    View all posts

Leave a Reply

Designed with WordPress

Discover more from युवानिया ~ YUVANIYA

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading