Site icon युवानिया ~ YUVANIYA

युवा महोत्सव में भाग लेने रायगढ़, महाराष्ट्र से आये युवाओं के अनुभव

उमेश ढुंमणे:

युवा महोत्सव, सेवाग्राम आश्रम, वर्धा, महाराष्ट्र. १६-१८ जून 2023. या संमेलनातील अनुभव खालीलपरमाणे;

– या संमेलनात घोषणा, गाणी, नाटक, वेगवेगळ्या विषयातील गटांमधून, चर्चेमधून, मार्गदर्शनाद्वारे-  

– ज्ञानाची क्षमता वाढण्यास मदत झाली,

– आत्मविश्वास वाढला, 

– जागरूकता असणे, 

– सरकारवर नजर ठेवली पाहिजे,

– वेळ पाळणे, 

– संचार कौशल्य,

– शैक्षणिक क्षमता, 

– कायद्याचे ज्ञान, 

– धैर्य ठेवणे 

अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

– कोणतेही काम करताना दुसऱ्याचे बोलणे लक्षदेऊन ऐकणे.

– समोरच्याला ओळखणे.

– मोजक्या चांगल्या शब्दांचा उपयोग करणे.

– कोणताही गोष्टी करताना प्रॅक्टिस गरजेची आहे.

– मुद्यला धरून बोलणे/ मुद्यची पकड असणे.

सध्याच्या काळात कार्यकर्त्यांकडे हे गुण असावेत असे वाटते.

युवामहोत्वामध्ये देशाचे उज्वल भविष दिसते.

—————————

नम्रता वाघमारे:

दिनांक 16 जून ते 18 जून पर्यंत वर्धा सेवाग्राम येथे झालेल्या युवा महोत्सव मला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. अनुभवायला भेटल्या. तसेच अनेक राज्यांमधून आलेले तरुण तरुणी युवक युवती पुरुष महिला अशा अनेक लोकांनी सहभाग घेतला होता.  तर रायगड जिल्ह्यामधून आम्हाला बारा लोकांना या युवा महोत्सव मध्ये सहभाग घ्यायला संधी मिळाली. त्या मुले मी सर्वहारा संघटनेचे खूप आभार मानते तसेच सर्व हारा संघटनेचे कार्यकर्ते यांचे सुद्धा मनापासून आभार मानते.

आपल्या भागामधून दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या वातावरणामध्ये एकमेकांसोबत मिसळून कशा प्रकारे रहावे आणि एकमेकांना कशाप्रकारे समजून घ्यावे हे योग्य प्रकारे समजून आले. युवा महोत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले गीते, नाटक, नृत्य, यामधून आपली परंपरा दाखवत आप आपल्या समाजामध्ये जे काही चालत आहे ते दाखवले यामधून नवीन गोष्टी अनुभवायला भेटल्या काही लोकांनी आधीच डान्स, संगीत, नाटके, याची तयारी केली होती तर काही लोकांनी तिथल्या तिथे नाटक, डान्स आणि गाणं स्वतः लिहून सादर केले होते तर यामध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक अशा समस्यांना तोंड कसे द्यावे हे दिसून आले. सेवाग्राम आश्रम या परिसरामध्ये बापू कुटी पाहायला मला संधी मिळाली हे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर तेथूनच आपल्याला नवीन ऊर्जा शिकण्याची संधी मिळते.

एकमेकांची भाषा समजत नसूनही एकमेकांसोबत कशा प्रकारे संवाद साधावा हे या युवा महोत्सवामध्ये खूप योग्य प्रकारे शिकायला भेटले. 

सूचना : 

—————————

रामदास जाधव:

दिनांक 16. जून पासून 18 जून. पर्यंत

महात्मा गांधी सेवाग्राम आश्रम. वर्धा

झालेल्या युवा. महोत्सवा. त

अनेक राज्यातून. मुला. मुली व आपल्या जिल्हा तुन.12. जणांना. मिळाली त्यामुळे. मी सर्व हारा. जन आंदोलन आणि श्रुती चे. आभार. 

  1. युवा महोत्सव शिबिरात वेगवेगळ्या राज्यातून आदिवासी बांधवानी परपरा तुन गाणी. नाटक भाषा याची माहिती मिळाली
  2. राजकारणात काय कसे होते ते समजण्याचे प्रयत्न केले
  3. संघटणासाठी फंड कसा व कुठून जमा करावा आणि कोणत्या फंडातून गोळा करावा
  4. जो कोणी संघटनेला धरून असेल तर घ्यावा आणि संघटणा जे बोलेल ते त्यांना करायला पाहिजे तर त्या फंडातून घ्यावे याची माहिती मिळाली

सर्वे कार्यकर्ते ना जिंदाबाद, जय आदिवासी

—————————

अस्मिता वाघमारे:

युवा महोत्सव मध्ये मला जाण्याची संधी मिळाल्यामुळे मी सर्वहारा जन आंनदोलन संघटनेची आभारी आहे.

कारेक्रमामदे मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या उसाहपूर्न वातावरण जिद्दीने काम करत आपापल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करणारी मित्र मंडळी मला भेटली. यात मला आलेल्या अनुभवाची मी खालील मुद्याच्या आधारे स्पटिकरण देते.

1) कार्यक्रमासाठी पूर्वतयारी:

युवा महोत्सवामध्ये वेगवेगळे नाटक, गीते, नृत्य, यामधून आपापली परंपरा दाखवण्यात आली. काहींनी तर नृत्य सादर केले. लोकांपुढे आपल्या समशा लोकांपुढे आणल्या आणि यांच्या उपायांकडे लक्ष वेधण्यात आले.

वेगवेगळ्या पार्ट्या करण्यात आल्या पार्टीमदे सगळ्याचे मत मांडण्याची संधी मिळाली.

2) आझाद महिला पार्टी विषयावर चर्चा केली.महिलांवर कसे अत्याचार होतात. महिला कशी आझाद होणार कस तिला स्वतःच्या हक्कासाठी लढायला लागेल. कस आपला हक्क स्वतः लढून मिळवायचा पार्टी मधे सगळ्या जाती चालतात कुटलाही जातीचा भेदभाव नसावा. असा नियम करण्यात आला.

पार्टी मधे प्रत्येकाचे मत घेवून नियम तयार करण्यात आले. महिलांची अधेक्ष ही महिला झाली पाहिजे. असा नियम सगळ्याचा मत घेवून काढण्यात आला.

जो पुरुष महिलेच्या भावनांना समजू शकतो त्या पुरुषाला महिलेचा सदश राहण्यास हरकत नाही. असा नियम करण्यात आला. 

युवा महोत्सवामधे खूप काही शिकणयासारखे होते. कस आपापल्या समाज्याच व इतर गरीब आदिवासीनचे हक्क मिळलवून देण्यासाठी कसे काम करतात. ते समजून घेण्याचा प्रयत्न केला.

—————————

अक्षय नाईक:

दिनांक 16 जून पासून 18 जून पर्यंत वर्धा सेवाग्राम येथे झालेला युवा महोत्सव म्हणजे माझ्यासाठी एक प्रेरणादायी कार्यक्रम होते. यामध्ये भारत देशातून विविध राज्यांतून अनेक तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्ह्यातून 12 जणांना संधी मिळाली. यामध्ये मला सुद्धा सहभाग घेण्याची संधी मिळाली त्यामुळे मी सर्वप्रथम सर्वहारा जन आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांचा आभारी आहे. कार्यक्रमामध्ये मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. उत्साहपूर्ण वातावरणात जिद्दीने काम करत आपल्या देशाच्या संविधानाचे रक्षण करणारी मित्र मंडळी मला भेटली. यात मला आलेल्या अनुभवांचा मी खालील मुद्यांच्या आधारे स्पष्टीकरण देतो.

1) कार्यक्रमासाठी पूर्वतयारी : युवा महोत्सवामध्ये अनेक सांस्कृतिक नाटकं, गीते, नृत्य यामधून आपापली परंपरा दाखवण्यात आली. यासाठी अनेकांनी आधीच नाटके तसेच गीते लिहून किंवा पाठ करून पूर्वतयारी केली होती. काहींनी तर तेथेच गीते, नृत्य सादर केली. मी निरीक्षण केले की याद्वारे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समस्या लोकांपुढे आणल्या आणि यांच्या उपायांकडे लोकांचे लक्ष वेधण्यात आले. सेवाग्राम आश्रम या परिसरातील प्रेरणादायी स्थळ बापूकुटी मला पहायची संधी मिळाली. आपल्याला समाजाचे काम करायचे असेल तर आपल्याला समाजामध्ये उतरावे लागते हे समजले.

2) वेळेचे नियोजन :

‘टाइम इस मनी’ असे म्हंटले जाते. कार्यक्रमामध्ये मला याचा अनुभव आला. परंतु वेळ पाळताना अनेकांनी संकोच दाखवला. ठरवलेल्या वेळेत कार्यक्रम घेण्यास कठीनता दिसून आली. सर्वांच्या उपस्थितीमध्ये अपूर्णता दिसली.

सूचना :

1)कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिक सटीक तचेच लक्षवेधी असावे. 

2) दिनचर्या ठरवून त्याचे पालन करवून घेणे आवश्यक आहे.

Author

Exit mobile version