वीणा रेहपाडे, नागपूर:
लिव्ह इन रिश्ता एक स्त्री व एक पुरुष यांनी विवाह न करता एकत्र राहणे असे सरसकट पणे ढोबळमानाने म्हणता येईल, पण समलिंगी सुद्धा एकत्र राहू शकतात जसे- दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया लिव्ह इन रिस्ता हा शब्दच एवढा भारी वाटतो? काय असेल लिव्ह इन रिश्ता? असे ग्रामीण भागातील लोकांना प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही हे काही वावग तर नसेल? आणि याचा अर्थ कळाल्यावर तर ते अवाक् च राहतील बापरे ! एका स्त्रीने व एका पुरुषांने लग्नाशिवाय एकत्र राहायचे केवढा घोर पाप! केवढा कलियुग आला हो ! हे वाक्य निघाल्याशिवाय राहणार नाही I या टीव्ही, मोबाईल ने दुनिया बिघडवली आहे असेच सर्वांना वाटेल “लिव्ह इन रिश्ता” याचे मान्यता देणे तर दूर हा सगळा सोंगच वाटेल ग्रामीण भागातील लोकांना I आमचे वेळी असं नव्हतं आमच्या वेळी तसं नव्हतं नानाविध प्रश्नांनी ग्रासलेली असतील सारे कारण साऱ्या समाजाची मानसिकता तशी बनलेली आहे भारतीयांवर जबर भारतीय संस्कृतीचा पडदा डोळ्यांवर पडलेला आहे I पूर्वीपासूनच स्त्रीया बंधनात जगत आल्या आहे दुय्यम प्रतीचे वागणूक घरात कुटुंबात व समाजात स्त्रियांना मिळते आणि एका स्त्रीने एका खोलीत लग्नाशिवाय दीर्घकाळासाठी एका पुरुषासोबत एकत्र राहायचं शक्यच नाही.त्या स्त्री व पुरुषाला गावातही ठेवण्यास तयार होणार नाही गावातील हे मनुवादी विचारांची लोक त्यांचं जगणं असह्य करून टाकतील नानाविध टीका व संशय घेतील पण असो….
आजच्या धकाधकीच्या जीवनात त स्त्रियांच्या जबाबदाऱ्या एवढ्या वाढल्या आहेत की एका स्त्रीला एवढ्या जबाबदाऱ्या पेलवता पेलवता नाकी नाऊ येते, तिलाही कुठेतरी स्वतःचे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य हे मिळालेच पाहिजे अर्थातच पुरुषांनाही I पुरुषांनाही वाटते कधीतरी तोही या जबाबदारीतून मुक्त व्हावा त्यालाही मुक्तपणे जगता यावे. ही विवंचना स्त्री व पुरुष दोघांचीही आहे मग अशावेळी एका पुरुष व एका स्त्रीने एकत्र राहणे वावग ठरणार नाही असे मला वाटते I एकमेकांचे प्रश्न जाणून घेणे त्यावरचे निरामकरण करणे कुठेही काहीही कॉम्प्रोमाइज न करता जीवन जगणे तेही मनसोक्तपणे दोन चांगले मित्र अथवा मैत्रिणी ही एकत्र राहू शकतात अथवा एक युवक व युती एकत्र राहू शकते युवक व युवकांनी असे निर्णय घेतले तर समाजात याला अजिबात मान्यता मिळणार नाही मात्र त्यांच्या या निर्णयाने हळूहळू बदल मात्र होऊ लागेल समाजाची मानसिकता बदलायला वेळ लागतो कोणतेही नवीन गोष्टी घडवायची म्हटलं तर वेळ लागणारच व विरोधक हे असणारच यात काही दुमत नाहीत पण समाजाच्या विरुद्ध जाऊन युवकांनी असा निर्णय घेणे योग्य तर ठरणार नाहीत कारण खूप काळपर्यंत एक तरुण युवक-युवती एकत्र राहणे फार कठीण आहे स्वतःच्या करिअरसाठी अनेक युवा मंडळी घराबाहेर राहतात आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्यांना कुणाच्यातरी आधाराची गरज असतेच आपल्या मनातील विचार, हालचाली, आशा-आकांक्षा स्वप्न मोकळे करण्याकरिता एक हक्काचा माणूस हवाच तेव्हा ती व्यक्ती एक चांगला मित्र म्हणून किंवा “लिव्ह इन रिस्ता” म्हणून पुरुष किंवा स्त्री असू शकते तेव्हा या नात्याला समाजाने मान्यता नक्कीच द्यावी नव्हे द्यायलाच पाहिजे “लिव्ह इन रिश्ता” मान्यता जरूर द्यावी असे मला वाटते I
विवाह न करता एकत्र राहणे यामुळे विवाह संस्थेला नक्कीच धोका निर्माण होऊ शकेल का??? हा पण मोठा गंभीर प्रश्नच आहे विवाह संस्थेला तसा धोका निर्माण होऊ शकेलच असे नाही कारण अलीकडच्या काळात आई-वडिलांच्या संमतीशिवाय कित्येक युवक युवती स्वतःची रजिस्टर मॅरेज करत आहे तेव्हा कुठे जाते विवाह संस्था कुठे जातात समाजाचे नियम असो पण यामुळे मात्र पैसा व वेळही वाचतो I जरा थोरामोठ्यांचा अपमान होतो आई- वडीलांच्या भावनि दुखावल्या जातात पण मुलीने अथवा मुलाने आपल्या भवितव्याचा विचार करून हा निर्णय घ्यावा असे मला वाटते व व समाजानेही याला याला रीतसर मान्यता द्यावी I
नवीन *”लिव्ह इन रिश्ता” * याला कोर्टाने सुद्धा मंजुरी दिली आहे तशी काळाची गरजही आहे I 21 व्या शतकात वाटचाल करत असताना युवा पिढीला सगळी नाती निभवता व टिकवता येणे अशक्यच होणार आहे सगळं तंत्रयुग निघालेले आहे नवीन विचार नवीन संकल्पना विचारात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला आहे वैचारिक बाजूने विचार केल्यास कोर्टाचा निर्णय योग्यच वाटतो बाकी भारतीय संस्कृतीचा आव आणणाऱ्या मनुवादी विचारांच्या लोकांना मात्र हा विचार हा न्याय अयोग्यच वाटेल हेही तेवढेच खरं पण “लिव्ह इन रिश्ता” असायलाच पाहिजे असे मला आवर्जून वाटते I

